मुक्ताई राम पालखीचं जळगावमधून प्रस्थान

June 14, 2011 8:46 AM0 commentsViews: 4

14 जून

पंढरपूरला जाण्यासाठी मुक्ताबाई राम पालखीचं आज जळगावहून प्रस्थान झालं आहे. ग्रामदैवत श्रीराम मंदिरापासून ही पालखी निघाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा या पालखीला आहे. खान्देशातील वारकर्‍यांचा सहभाग असलेली ही पालखी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीस वाकडी गावात भेटते. जय जय रामकृष्ण हरी च्या नामघोषात आणि टाळ, चिपड्याच्या तालात वारकरी आज मार्गस्थ झाले आहे.

close