राज्यातील विद्यार्थांना आता ‘डोमीसाईल’ची गरज नाही

June 13, 2011 5:52 PM0 commentsViews: 2

13 जून

राज्यात बारावी पास विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी डोमीसाईल सर्टिफिकेटची समस्या जाणवतेय. त्यामुळे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवेशासाठी डोमीसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नसेल.

त्यांचा प्रवेश हा केवळ जन्मतारखेच्या दाखल्यावरुनच केला जाईल. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. पण शैक्षणिक प्रवेशा व्यतिरिक्तइतर कामांसाठी मात्र डोमीसाईल सर्टिफिकेटची सक्ती आहे तशीच कायम राहणार आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

close