हर्षवर्धन पाटील-अजित पवांराची जुगलबंदी

November 12, 2008 12:52 PM0 commentsViews: 24

12 नोव्हेंबर, इंदापूरएखाद्या निवडणुकीत आरोप प्रत्योरोपांच्या फैरी विरोधकांकडून झाडल्या जातात. पण राज्यसरकारमधल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी एकमेकांवर शिवराळ भाषेत आरोप केले. इंदापूर आणि बारामती कार्यक्षेत्रात असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. यात सव्वीसपैकी पंचवीस जागांवर अजित पवार यांचं मानलं जाणार्‍या जय भवानी पॅनलचा विजय झाला. तर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धूम सध्या सर्वत्र आहे. मात्र या निवडणुकांमध्ये जलसंपदामंत्री अजित पवार आणि पणनमंत्री हर्षवर्धन पाटील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार यांनी तर शिवराळ भाषा वापरत हर्षवर्धन पाटील यांना थेट आव्हानंही दिलं.

close