चारित्र्यावर संशय घेतला म्हणून भावाने केला बहिणीवर गोळीबार

June 14, 2011 8:54 AM0 commentsViews: 2

14 जून

चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे भावाने बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. नम्रता ढपसे असं या मुलीचं नावं आहे. तर भावाला काल रात्री पोलिसांनी अटक केली.

धक्कादायक बाब म्हणजे या विकृत मनोवृत्तीच्या भावाने यापूर्वी आपल्या मोठ्या बहिणीवरही चारित्र्याच्या संशयावरुन चाकूने हल्ला केला होता. विशेष म्हणजे या विकृत मनोवृत्तीच्या भावाला कुटुंबीयांनीही पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या भावाच्या संशयास्पद वर्तणूकीवरुन पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान नम्रताला नगरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close