ह्रतिकची आता छोट्या पडद्यावर एंट्री

June 14, 2011 11:26 AM0 commentsViews:

भाग्यश्री वंजारी , मुंबई

14 जून

शाहरुख, सलमाननंतर आता सुपस्टार ह्रतिक रोशनही छोट्या पडद्यावर झळकणार आहे. जस्ट डान्स या डान्स रिऍलिटी शोचा ह्रतिक जज आहे. या शोच्या ऑडिशन्स सद्या सुरु झाल्या आहे. याचंच निमित्त साधत ह्रतिकने या शोबद्दलचे प्लॅन्स माध्यमांबरोबर शेअर केले.

द गॉड ऑफ डान्स ह्रतिक रोशनची पत्रकार परिषदेत घेतलेली दमदार एंट्री खर्‍या अर्थाने उपस्थितांना सब कुछ भुलाके जस्ट डान्स सांगणारी होती. जस्ट डान्स या नव्या रिऍलिटी शोच्या जजच्या माध्यमातने ह्रतिक रोशन आता टेलिव्हिजनवर प्रवेश करत आहे. अर्थात आता हा सुपरस्टार एखादा शो जज करणार म्हणजे नक्की तो शो आणि त्याची संकल्पनाही त्या ताकदीचीच असेल.

डान्स हे पॅशन मानणार्‍या ह्रतिकसाठी हा शो म्हणजे एक फुल लाईफ अनुभव असेल. ह्रतिकशी बोलताना याशोबद्दलची त्याची उत्सुकता आवर्जुन जाणवली. तर ह्रतिक बरोबर कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि फराह खान याही या शोच्या जजेस आहेत. विशेष म्हणजे फक्त शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकच नाहीतर घरातल्या गृहिणी किंवा सर्वसामान्य नोकरदार वर्गांनाही या शोमधून डान्सच्या खास टीप्स मिळणार आहे.

close