डे यांच्या हत्येशी संबंध नाही – महाबोले

June 14, 2011 12:03 PM0 commentsViews: 7

14 जून

जे.डेंच्या हत्येप्रकरणी होत असलेले आरोप एसीपी अनिल महाबोले यांनी फेटाळले आहे. आपल्याविरुद्ध हा कट असल्याचा आरोप त्यांनी आयबीएन-लोकमतशी बोलतांना केला. काल सोमवारी जे.डे यांच्या हत्येच्या संशयावरून महाबोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अचानक झालेल्या बदलीमुळे पोलीस खात्याला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, महाबोले यांनी सर्व आरोप फेटाळले आयबीएन लोकमतशी बोलताना म्हणाले की, जे.डे यांच्याशी माझी ओळखी 2005 पासून होती. जे.डे जेव्हा हिंदुस्थान टाईम्सला क्राईम रिपोर्टर होते तेव्हा त्यांनी एका तेल माफियाच्या विरोधात एक बातमी केली होती त्यामध्ये त्यांनी माझं नावं ही लिहलं होतं. याबद्दल मी त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा खटला ही दाखल केला होता.

हा खटला अजून कोर्टात सुरू आहे. या खटल्या दरम्यान डे यांच्याशी भेट होतं असतं तेव्हा त्यांनी चुकीची माहिती आली म्हणून नावं लिहलं गेलं आपण केस मागे घ्यावी अशी विनंती ही डे यांनी केली होती. मी ही तसा विचार करत होतो. पण डे यांच्या हत्येशी माझा कोणताही संबंध नाही ज्यावेळी खरे गुन्हेगार पकडले जातील तेव्हा सर्व गोष्टींचा खुलासा होईल. तेव्हाचं आपली बदली का करण्यात आली हे ही सांगण्यात येईल असा खुलासा एसीपी अनिल महाबोले यांनी केला.

दरम्यान, डे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यायला नकार दिला नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. पण आधी मुंबई पोलिसांना तपास करू द्या त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपवायचा का यावर विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

close