महापालिकेचा नाले सफाईचा दावा नाल्याच्या काठावरच

June 14, 2011 4:44 PM0 commentsViews: 23

14 जून

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्याचा महापालिकेचा दावा पहिल्या पाण्यातच वाहून गेला आहे. भांडूप व्हिलेज रोडचा नाला पावसाळा सुरु झाला तरी स्वच्छ करण्यात आला नाही. व्हिलेज रोडवरच्या या मुख्य नाल्याला भांडूप आणि मुलुंडचे अनेक छोटे नाले येऊन मिळतात.

कंत्राटदाराने नाल्यातला वरवरचा कचरा काढला आणि तो नाल्याच्या काठावर ठेवला. तसेच नाल्याची सुरक्षा भिंतही तुटले आहे. यामुळे हा कचरा पुन्हा जाऊन नाल्यात मिळण्याची शक्यता आहे.

या नाल्यात अनधिकृतपणे बांधकाम करुन त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यंानी या नाल्याच्या साफसफाईचं कंत्राट दिलं पण काम पूर्ण झाल्यावर पाहणी मात्र केली नाही. तसेच अनधिकृत बांधकामाकडेही काणाडोळा केलेला दिसतोय.

close