लोकपाल समितीची उद्या बैठक

June 14, 2011 4:55 PM0 commentsViews: 3

14 जून

सरकार आणि अण्णांची टीम यांच्यातील संबंध ताणले गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या 15 जूनला लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीची बैठक होत आहे. उद्याच्या बैठकीला नागरी समितीचे सदस्यही हजर राहणार आहेत.

बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी सरकारने पोलिसी बळाचा वापर केल्यानंतर सरकार आणखी आक्रमक झालंय. आणि अण्णांच्या टीमच्या इशार्‍यांना बळी पडायचं नाही असा निर्धार सरकारने केला आहे. अशा वातावरणात उद्याची बैठक कितपत यशस्वी होते याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

close