डी. बी. रिऍल्टीची मालमत्ता जप्त करणाला सुरूवात

June 14, 2011 5:02 PM0 commentsViews: 5

14 जून

2 जी घोटाळ्याप्रकरणी डी. बी. रिऍल्टी ही कंपनी आणखी अडचणीत आली आहे. डी. बी. रिऍल्टीचे बँक अकाऊंट्स आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं सुरू केली आहे. डी. बी. रिऍल्टीकडून द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कलाईग्नार टीव्हीला 200 कोटींची लाच देण्यात आली होती, असा आरोप आहे.

याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिले होते. 200 कोटी रुपये हे या घोटाळ्याशी संबंधित आहेत. आणि ते परत मिळवायला हवेत असं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. डी. बी. रिऍल्टीचे बँक अकाऊंट्स आणि मालमत्ता जप्त करावी अशी सूचना सीबीआयने एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला पत्र पाठवून केली होती.

close