चिदंबरम मतमोजणीत फेरफार करून विजयी झाले – जयललिता

June 14, 2011 5:17 PM0 commentsViews: 1

14 जून

द्रमुकची चोहोबाजूंनी कोंडी झाल्यानंतर राजधानी दिल्लीत आता नव्या राजकीय समिकरणाची चर्चा सुरू झाली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयललिता यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल केला.

चिदंबरम यांनी 2009 च्या लोकसभा निवडणूक हरले होते. पण, मतमोजणीत फेरफार करून ते विजयी झाल्याचा आरोप जयललिता यांनी केला. चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. पण त्याचबरोबर जयललिता यांनी यूपीएशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची इच्छाही व्यक्त केली. 2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकवर त्यांनी हल्ला चढवला. आणि या घोटाळ्यात नव्याने चर्चेत आलेले माजी दूरसंचार आणि सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यावा अशी मागणी जयललितांनी केली.

close