शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात शाळा सोडल्याचा दाखला

June 15, 2011 11:57 AM0 commentsViews: 20

15 जून

ठाण्यातील खारीगाव येथील भाविका विद्यालयातील मराठी माध्यमाच्या 8 वी ते 10 इयत्तेच्या सर्व वर्गांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांच्या हातात लिव्हिंग सर्टीफिकेट देण्यात आलं.

यामुळे एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या 450 पालकांनी जिल्हा परिषदेच्या ऑफिसजवळ आंदोलन केलं. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या वादामुळे या शाळेची मान्यता शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी रद्द केल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी सांगितलं. पण पालकांच्या मागणीचा जिल्हा परिषद विचार करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

close