आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : खाणीमध्ये जीवितहानी झाल्यास गुन्हा दाखल

June 15, 2011 12:03 PM0 commentsViews: 5

15 जून

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जांभा दगडाच्या उघड्या खाणी धोकादायक असल्याचे वृत्त आयबीएन लोकमतनं दाखवलं होतं. या उघड्या खाणींमुळे इथल्या असल्यामुळे जीवितहानीला कारणीभूत ठरत असल्याचे वृत्त आयबीएन लोकमतनं दाखवलं होतं. याची तत्काळ दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून अशा खाणी सुरक्षीत करण्यात याव्यात असे आदेश जिल्हा खणिकर्म विभागाने सगळ्या तहसिलदारांना दिले आहेत. अशा खाणींमध्ये अपघात घडून जीवितहानी झाल्यास परवानाधारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही या आदेशात म्हटलं आहे.

close