जे. डे हत्याप्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात

June 15, 2011 12:14 PM0 commentsViews:

15 जून

ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहे. या हत्येत छोटा शकील सामील असल्याचा संशय आहे. या प्रकरणी आज तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यातल्या दोघांना मुंबईतून तर तिसर्‍याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुंबईतून ताब्यात घेतलेल्यांची नाव इकबाल हटेला आणि मतीन अशी आहे. पवई पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. हे तिघंही अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलसाठी काम करत असल्याचं समजतंय.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जे. डे हत्याप्रकरणी महत्त्वाचे खुलासे होतील अशी आशा व्यक्त केली आहे. आज संध्याकाळपर्यंत पोलीस काही महत्त्वाचे खुलासे करेल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पण याबाबत जास्त बोलायला नकार दिला.

close