मधुकर पिचड यांनी घेतली मुंडेंची भेट

June 15, 2011 12:10 PM0 commentsViews: 4

15 जून

भाजपचे नाराज नेते गोपीनाथ मुंडे यांची रोज नवनवीन व्यक्तींना भेटणं सुरूच आहे. कधी शेजार्‍याची चौकशी कधी राज्यातल्या पाऊस गप्पा या ना त्या निमित्ताने मुंडेच्या भाजप सोडून इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी सुरू आहेत.

आज निमित्त होतं सकाळी चहापानाचं मधुकर पिचड यांच्यासोबत. आज सकाळी मधुकर पिचड, गोपीनाथ मुंडेंच्या घरी गेले होते. आता हे दोघंही सांगताहेत की, आमच्यात काही राजकीय चर्चा झाली नाही. पण दोघांमध्ये साधारण पाऊण तास चर्चा झाली.

पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत शिवाय आदिवासी समाजाचे नेतेही. आदिवासी समाजात त्यांच देशभर मोठं नेटवर्कही आहे. आदिवासी समाजाच्या या नेत्याने मुंडेंची भेट घेतल्याने आणखी कुठली समीकरण जुळून येत आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

close