ओबामांच्या नव्या शैक्षणिक धोरणांविषयी उत्सुकता

November 12, 2008 1:15 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर, मुंबईकविता कृष्णनओबामांच्या विजयामुळे अमेरिकन विद्यापिठांना त्यांच्याकडे येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. ओबामांनी यासंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण बुश प्रशासनाच्या काळात कडक असलेल्या स्टुडंट व्हिसाच्या अटी आता शिथिल होतील असं अनेक विद्यापिठांना वाटतयं. जागतिक मंदीमुळे अमेरिकेत कर्मचार्‍यांची कपात होत असली तरी भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली नाही. डॉलर महागलाय, त्यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढलाय. पण असं असूनही दरवर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं चित्र आहे. नोकर्‍यांच्या दृष्टीनं विचार केला तर या विद्यापिठांचं माजी विद्यार्थ्यांचं नेटवर्क चांगल आहे आणि याचा नव्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. पण यासाठी गरज आहे ती ओबामांनी आपलं धोरण लवकरात लवकर जाहीर करण्याची

close