सोनवणे जळीतकांड प्रकरणी 3 आरोपींवरचा मोक्का रद्द

June 15, 2011 10:57 AM0 commentsViews: 2

15 जून

मनमाडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांड प्रकरणी मनमाड पोलिसांनी 15 आरोंपीना मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र या 15 आरोपींपैकी 3 आरोपींवर सुरू असलेल्या मोक्का कारवाईला मुंबई हायकोर्टाने आज स्थगिती दिली आहे.

नाशिकचे अतिरीक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची 25 जानेवारीला जाळून हत्या करण्यात आली होती. तेलमाफिया पोपट शिंदे आणि इतर असे एकूण 12 आरोपी आहेत. हत्याकांडातला मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा याआधीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मनमाड पोलिसांनी 12 जणांना अटक केली. अटकेत असलेल्या अनेक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्यावर मोक्काची कारवाई सुरू झाली. मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करताना मनमाड पोलिसांनी एकूण 15 जणांवर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता.

या 15 जणांपैकी धीरज येवले, जगन पिंपळे आणि मदन ठाकूर या तिघांची नावही होती. यामुळे धिरज येवले याने काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आजच्या सुनावणीत हायकोर्टाने येवले याच्या वकिलाचा युक्तीवाद मान्य करून 3 आरोंपीवरच्या मोक्का कारवाई बाबत स्थगिती दिली.

close