..आणि वडालाही दीर्घायुष्य लाभो

June 15, 2011 10:19 AM0 commentsViews: 10

15 जून

आज राज्यभरात वटपौर्णिमा साजरी होत आहे. पण काळ बदलतो तसे संदर्भही. सावित्रीने सत्यवानाला संजीवनी दिली. आज गरज आहे ती नष्ट होत जाणार्‍या वटवृक्षांना संजीवनी देण्याची. नाशिक-मुंबई हायवेच्या चौपदीकरणात आड येणारी 200 वडाची झाडं पर्यावरणवादी संस्थांनी वाचवली. मोठ्या जिकीरीनं म्हसरूळच्या माळरानावर त्यांचं ट्रान्सप्लॅण्ट केलं. आज या वृक्षांना पालवी फुटली. ट्रान्सप्लॅण्टनंतर जगलेल्या या वडाच्या झाडांची पूजा नाशिककर भगिनींनी केली. पतीसोबत या वडालाही दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना त्यांनी केली.

close