शिर्डीत दोन तरुणांची हत्या

June 15, 2011 3:24 PM0 commentsViews: 5

15 जून

शिर्डीमध्ये रात्री दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकार सुदेश पाटणी यांचा मुलगा रचित पाटणी आणि साईसंस्थानमध्ये काम करणार्‍या विलास गोंदकर यांचा मुलगा प्रविण गोंदकर यांचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. किरकोळ भांडणाचा वचपा काढण्यासाठी ही हत्या झाल्याचं कळतं.

ग्रामस्थांनी एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अटक केलेल्या आरोपीने आपल्यासोबत आणखी 5 जण असल्याचं कबूल केलं. दरम्यान मारेकर्‍यांना त्वरीत अटक करण्याच्या मागणीसाठी गावकर्‍यांनी नगर- मनमाड हायवे वर चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनामुळे वाहतूक दोन तास खोळंबली होती.

close