चांद्रयान चंद्रापासून 100 कि.मी. वर

November 12, 2008 2:26 PM0 commentsViews: 19

12 नोव्हेंबरभारताचं मानवरहित पहिलं चांद्रयान वन चंद्राच्या कक्षेत 100 किलोमीटर अंतरावर यशस्वीपणे पोहोचलंय. संपूर्ण भारतीय बनवाटीचं हे यान 22 ऑक्टोबरला श्रीहरीकोटा येथून चंद्रावर सोडण्यात आलं होतं. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चांद्रयानाचा इम्पॅक्टर प्रोब चंद्रावर आदळण्यात येणार आहे. त्यानंतर चंद्राचे अतिशय जवळून काढलेले प्रत्यक्ष फोटो इस्त्रोला मिळतील. चांद्रयानाचा इम्पॅक्टर हा 21 इंच टीव्हीच्या आकाराचा चौरस असून त्याच्यावर चारी बाजूंनी भारतीय तिरंग्यांचा चित्र काढण्यात आलंय. मात्र, हा इम्पॅक्टर चंद्रावर नेमका कोणत्या क्षणी आदळेल, हे इस्त्रोतर्फे अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. चांद्रयानाचा चंद्राच्या कक्षेत 100 किलोमीटरवरचा प्रवास हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं आणि शास्त्रज्ञांचं मोठं यश मानण्यात येत आहे.

close