आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : लालबाग पूलावर खड्‌ड्याबाबत कारवाईचे आदेश

June 15, 2011 3:52 PM0 commentsViews: 4

15 जून

मुंबईत होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएनं लालबाग ते भायखळा असा जवळपास 2.5 कि.मी. लांबीचा पूल बांधला. या पूलाचे उद्धघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पण उद्घाटनाच्याच दिवशी या पूलावर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते.

त्यामुळे या पूलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. आय बी एन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर याची पूलाच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली.

close