ख्रिस गेल कसोटी सामान्यात खेळण्याची शक्यता

June 15, 2011 4:39 PM0 commentsViews: 2

15 जून

विंडीज दौर्‍यावर वन-डे मॅचसाठी बाहेर बसलेला ख्रिस गेल टेस्ट मॅचमध्ये परत येण्याची शक्यता आहे. या अगोदर ख्रिस गेल याला वेस्ट इंडिजच्या वन-डे टीममधून वगळण्यात आलं होतं.मात्र टेस्ट टीममध्ये तो परतण्याची शक्यता आहे. पहिली टेस्ट मॅच सोमवारी जमैकाला खेळवली जाणार आहे.

गेल्या महिन्यात एका रेडिओला वादग्रस्त इंटरव्ह्यु दिल्या प्रकरणाचा खुलासा गेल वेस्ट इंडिज बोर्डाकडे देणार आहे. रेडिओ दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये विंडीज बोर्डाविरूद्ध वक्तव्य केल्यामुळे 31 वर्षीय गेलला भारताविरूद्धच्या वन-डे सीरिजमधून डावलण्यात आलं होतं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जुलियन हंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरनेस्ट हिलेरी मिटींगसाठी जमैकात दाखल झाले आहेत.

close