चंद्र लपणार पृथ्वीआड

June 15, 2011 5:01 PM0 commentsViews: 2

15 जून

आज मध्यरात्री आपल्याला या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. आज रात्री चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येणार आहे. त्यामुळे तो काही काळ नाहीसा होईल.

आज रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या छायेत प्रवेश करेल. मध्यरात्री 12 वाजून 52 मिनिटांनी चंद्राची खग्रास अवस्था सुरू होईल. चंद्राची ही स्थिती 100 मिनिटं राहणार आहे. रात्री 1 वाजून 42 मिनिटांनी चंद्रग्रहणाची सर्वोच्च स्थिती पाहायला मिळेल यावेळी चंद्र दिसेनासा होईल. तर रात्री 2 वाजून 32 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण संपेल. संपूर्ण भारतासह आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे चंद्रग्रहण पाहायला मिळेल. यानंतर अशा प्रकारचं चंद्रग्रहण केवळ 2141 मध्येच दिसणार आहे.

close