स्वामी निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी !

June 15, 2011 3:40 PM0 commentsViews: 3

15 जून

तब्बल 69 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या स्वामी निगमानंद यांचा सोमवारी मृत्यू झाला. स्वामी निगमानंद यांचा विषबाधेमुळे झाला असावा असं त्यांच्या ब्लड पॅथॉलॉजी रिपोर्टमधून दिसून येतंय. गंगा नदीपात्रातल्या मायनिंग प्रकल्पावर बंदी घालायला उत्तराखंड सरकारने नकार दिल्यामुळे निगमानंद उपोषणाला बसले होते.

प्रकृती बिघडल्याने त्यांना डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोमात गेले होते. पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार त्यांच्या रक्तात टॉक्सिनचं खूप जास्त प्रमाण आढळून आलंय. हे विषारी द्रव्य कीटकनाशकांचं असल्याचंही आढळलं. दरम्यान निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी स्वामी अग्निवेश यांनी केली. तसेच त्यांच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची मागणीही त्यांनी केली.

close