लखीमपूर बलात्काराचा तपास सीबीआयकडे द्याला मायावतींचा नकार

June 15, 2011 3:47 PM0 commentsViews: 3

15 जून

उत्तर प्रदेशातील लखीमपूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीआयडीने 17 जूनच्या आत तपासाचा अहवाल सादर करावा असा आदेश अलाहबाद हायकोर्टाने दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री मायावती यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवायला नकार दिला.

आरुषी हत्याकांडात सीबीआयला आलेल्या अपयशाचे कारण देत मायवती यांनी लखीमपूर प्रकरण सीबीआयकडे सोपवायला नकार दिला. तसेच लखीमपूरच्या एसपींना निलंबित करण्यात आले आहे.

लखीमपूर पोलीस स्टेशनच्या परिसरात 14 वर्षाच्या सोनम नावाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. तिनं आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. पण पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये सोनमची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय.

close