सरबजीत सिंगला भेटण्याची त्याच्या बहिणीला परवानगी

June 15, 2011 2:55 PM0 commentsViews: 4

15 जून

पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंगला भेटण्याची परवानगी त्याच्या बहिणीला मिळाली आहे. लाहोर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे. त्यानुसार सरबजीतची बहीण दलबीर कौर उद्या लाहोरमधल्या कोट लखपत जेलमध्ये त्याची भेट घेणार आहे.

1990 मध्ये लाहोरमध्ये चार बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट आखल्याचा सरबजीतवर आरोप आहे. त्या स्फोटात 14 जण ठार झाले होते. त्याचप्रकरणी सरबजीतला 2008 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सरबजीतची शिक्षा पुढ ढकलण्यात आली होती..

close