जे.डे. हत्याप्रकरणी सरकारने भूमिका मांडवी – मुंबई हायकोर्ट

June 16, 2011 10:28 AM0 commentsViews: 3

16 जून

पत्रकार जे. डे हत्याप्रकरणी ऍडव्होकेट जनरलला सरकारची भूमिका मांडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने आज दिले. जे. डे हत्येचा सीबीआयने तपास करावा अशी याचिका ऍड. पाटील आणि केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

न्यायाधीश रंजना देसाई आणि रंजित मोरे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने सरकारला या हत्येच्या तपासाचा अहवालही सादर करायला सांगितला आहे.

दरम्यान, आज पत्रकारांनीही या हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. कोर्टाने ही याचिकाही आधीच्या याचिकेत सहभागी करून घेतली आहे. आता या याचिकेची पुढील सुनावणी 21 जूनला होणार आहे.

close