गोगावले यांनी घेतली गोपीनाथ मुंडेंची भेट

June 16, 2011 2:27 PM0 commentsViews: 1

16 जून

पुण्यातील भाजप नेते योगेश गोगावले यांनी आज समर्थकांसह गोपीनाथ मुंडेंची भेट घेतली. पुणे शहर भाजप अध्यक्ष पदासाठी गोगावले इच्छुक होते. आपल्याला डावललं गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडीसंदर्भातला व्यंकय्या नायडूंनी जानेवारीमध्ये तयार केलेला अहवाल जाहीर करावा गोपीनाथ मुंडेंनी कार्यकर्त्यांची ही इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजप नेते मुंडे यांच्याशी संपर्क साधला. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे यांची त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घेतली. त्यानंतर शिंदे सेनाभवनात गेले असून तिथे उद्धव ठाकरे यंाची भेट घेणार आहेत. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

close