सुएझ जहाजाला आणण्यासाठी भारताचे पथक रवाना

June 16, 2011 2:34 PM0 commentsViews: 5

16 जून

समुद्री चाच्यांनी मुक्तता केलेल्या एम. व्ही. सुएझ जहाजाला सुरक्षित परत आणण्यासाठी अखेर भारताने पथक पाठवले आहे. भारतीय नौदलाची गोदावरी ही नौका एम. व्ही. सुएझ जहाजाला ओमानच्या सालालह बंदरापर्यंत सोबत करेल. सोमाली चाच्यांनी या बोटीची तब्बल 10 महिन्यांनंतर सुटका केली पण लगेचच जहाजावर पुन्हा हल्ला करण्यात आला.

आता एम व्ही सुएज जहाज गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ओमानला पोचण्याची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर त्यातील 6 भारतीय खलाशी भारतात विमानाद्वारे परत येतील. एम. व्ही. सुएजवरच्या खलाशांनी भारताकडे वारंवार मदत मागितली होती. पण पाकिस्तानच्या पीएनएस बाबर जहाजाने या बोटीला मदत करायची तयारी दाखवल्यानंतरच भारतीय नौदलाने याविषयी पावलं उचलली.

close