ठाण्यात टिएमटी बससेवेत 1 रुपयाने वाढ

June 16, 2011 3:15 PM0 commentsViews: 2

16 जून

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेनं बस भाड्यात आज 1 रुपया दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आधीच महागाईने जेरीस आलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी नवा भार सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे टीएमटीनेे हा निर्णय घेतल्याचं समजतंय. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एसी बसच्या भाड्यात मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसीची हवा जुन्याच भाड्यात अनुभवता येणार आहे. नव्या दरवाढीनुसार आता किमान दर 4 वरून 5 रूपये होणार आहेत.

close