विठोबाच्या दर्शनाला संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना

June 16, 2011 10:48 AM0 commentsViews: 12

16 जून

आज त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या वारीसाठी निघाली आहे. त्र्यंबकेश्वर आसपासच्या गावातल्या वारकर्‍यांना घेऊन 19 दिंड्या यात सहभागी झाल्या आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीकडून निवृत्तीनाथांच्या पादुका घेण्यात आल्या. कुशावर्तावर त्यांचं विधीवत पूजन झालं आणि त्यानंतर पालखी गावाबाहेर पडली. निवृत्तीनाथ महाराजांच्या नामस्मरणाचा एकच जयघोष यावेळी वारकर्‍यांनी आणि त्र्यंबकच्या भाविकांनी केला.

close