नाशिकचा खतप्रकल्प बनला दुर्गंधीची बजबजपुरी

June 16, 2011 10:59 AM0 commentsViews: 2

16 जून

एकेकाळी नाशिकचं भूषण समजला जाणारा खतप्रकल्प सध्या दुर्गंधीची बजबजपुरी बनलं आहे. नाशिक शहरातला कचरा घंटागाड्यांमधून कचरा डेपोवर आणला जातो. इथं त्यापासून खत बनवण्याची यंत्रणा उभी करण्यात आली. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

पण तंत्रज्ञ नाही म्हणून काही यंत्र धूळ खात पडली आहे. तर दुसरीकडे तयार झालेलं खतही पडून आहे. सध्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनलाय तो या खत प्रकल्पावरून पसरणारी दुर्गंधीचा. यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे नाराज आहेत. पण महापालिकेचे पदाधिकारी मात्र खतप्रकल्पाच्या दौर्‍यात सुक्यामेव्यावर ताव मारण्यात समाधानी आहेत.

close