भंडारामध्ये खंडणीसाठी 12 वर्षाचा मुलाचा खून

June 16, 2011 4:43 PM0 commentsViews: 1

16 जून

भंडारामधील आकाश बोकडे या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघड झालं आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर तुमसर जवळ आकाशचा मृतदेह मिळाला. 5 जूनला भंडारा इथून त्याचं अपहरण झालं होतं मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी फोन करून 5 लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी देऊ न शकल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेतली. अपहरण कर्त्यांनी आपली मागणी मान्य होत नसल्यामुळे आकाशचा खून केला. या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे.

close