नवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी

June 16, 2011 11:15 AM0 commentsViews: 6

16 जून

नवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी गेला आहे. नेरुळला राहणार्‍या 45 वर्षांच्या जयश्री घाडी यांना डेंग्यूची लागण झाल्यावर सुरवातीला नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. बुधवारी रात्री उशीरा त्यांचं निधन झालं. घाडी यांना झालेली डेंग्युची लागण आणि त्यांचा मृत्यू यामुळे नवी मुंबईत डेंग्यूची साथ पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

close