बापूजींच्या नावाने उदोउदो करणार्‍या सरकारचे आश्रमाकडे दुर्लक्ष – तुषार गांधी

June 16, 2011 4:49 PM0 commentsViews: 1

16 जून

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सेवाग्राम आश्रमाबद्दल सरकारच्या उदासिन धोरणाबद्दल टीका केली. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाचा हिरक महोत्सवाच्या कार्यक्रमात गांधी बोलत होते. राजकारणी महात्मा गांधीच्या नावाचा उदोउदो करतात पण सेवाग्राम आश्रमाच्या विकासासाठी कुठल्याही बजेटमध्ये साठी तरतुद सोडा उल्लेखही करत नाही.

सेवाग्राम आश्रमाच्या प्रतिष्ठानवरच्या कार्यप्रणालीवरही तुषार गांधी यांनी टीका केली. गांधी विचारांची आजच्या काळात आहेत पण विचार तरुणांपर्यत न पोहचल्याने अशा कार्यक्रमात बंदुकधारी नक्षलवादी आढळतील अशी भीतीही गांधी यांनी व्यक्त केली. सेवाग्राम आश्रमाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणार होते पण ते आलेच नाहीत.

close