जागतिक तलवारबाजी टीममध्ये कल्याणची 4 मुलं

November 12, 2008 3:08 PM0 commentsViews: 57

11 नोव्हेंबर कल्याण किरण सोनावणे चीन-तैपेई इथं 19 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताची सतरा जणांची टीम निवडण्यात आली आहे. या टीममध्ये कल्याणमधल्या चार मुलांचाही समावेश आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरला होणार असल्यामुळे या मुलांना सरावासाठी वेळ कमी मिळणार आहे. असं असलं तरी मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करण्याची आशा ही मुलं बाळगून आहेत. भारतात चर्चा होते ती क्रिकेटर आणि टेनिसपटू यांचीच. इतर खेळ आपल्याकडे अजूनही दुर्लक्षितच आहेत. पण मुंबई जवळच्या कल्याणमधल्या सेक्रेड हार्ट शाळेने तलवारबाजी या खेळाचं प्रशिक्षण शाळेत सुरू केलं. अगदी एका वर्षाच्या आत त्यांच्या मुलांनी या खेळात नैपुण्य मिळवलं आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकल्यावर आता शाळेतल्या चार मुलांची निवड चीन-तैपेईमध्ये होणा-या जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.या मुलांना भूषण जाधव यांनी प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी दिवाळीची सुट्टी आणि विशेष कॅम्पस आयोजित करून या मुलांवर विशेष मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या जागतिक स्पर्धेत खेळायची संधी या मुलांना पहिल्यांदाच मिळत आहे. त्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

close