जे.डे हत्याप्रकरणी तेलमाफियाची चौकशी

June 16, 2011 5:29 PM0 commentsViews: 4

16 जून

पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी तेलमाफिया मोहम्मद अली याची क्राईम ब्रांचने नायर हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. आतापर्यंत 50 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी चार नवे प्रत्यक्षदर्शी पुढे आले आहे. हे चारजण सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आढळले होते. तेल माफिया टोळ्या आणि अंडरवर्ल्डशी संबंधित चाळीस जणांची चौकशी झाली आहे. दरम्यान बुधवारी ताब्यात घेण्यात आलेल्या मतीन आणि अन्वर यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं होतं. पण आता त्यांना पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close