स्वामी निगमानंद यांचा मृतदेह घेण्यास नातेवाईक पोहचले

June 16, 2011 2:24 PM0 commentsViews: 6

16 जून

तब्बल69 दिवस उपोषणाला बसणारे स्वामी निगमानंद यांचं 13 जूनला निधन झालं. त्यांचं दुसर्‍यांदा पोस्टमार्टेम होणार आहे. यावेळी तीन डॉक्टर्स उपस्थित असतील. अशी माहिती मेडिकल ऑफिसर्सनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वामी निगमानंद यांचं निधन झालं होतं. आज त्यांचा मृतदेह घेण्यासाठी त्यांचे वडील आणि भाऊ हरिद्वारच्या मातृसदन आश्रमात पोहचले.

निगमानंद यांचं पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलीय. पण आश्रमाने त्यांची मागणी फेटाळून लावली. निगमानंद यांनी संन्यास घेतला होता त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर आश्रमाचा हक्क असल्याचं आश्रमाने म्हटलंय. निगमानंद यांचे वडील आणि भाऊ आश्रमाच्या बाहेर ठिय्या देऊन आहेत.

close