आयमान अल जवाहिरी ओसामाचा वारसदार

June 16, 2011 5:36 PM0 commentsViews: 3

16 जून

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर आता आयमान अल जवाहिरी याची अल कायदाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. अल कायदाशी संबंधित वेबसाईट्सवर ही माहिती देण्यात आली. ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे.

न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती.

ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे. न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती.

कोण आहे जवाहिरी?

- इजिप्तमध्ये जन्म – व्यवसायनं डोळ्यांचा डॉक्टर – इजिप्तच्या प्रतिष्ठीत मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण – 1980 मध्ये ओसामाशी भेट – अल-कायदाच्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार मानला जातो – अल-कायदाच्या सर्व निर्णयात जवाहिरीची महत्त्वाची भूमिका- एफबीआय च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये ओसामानंतर जवाहिरीचा नंबर – अफगाण-पाकिस्तान सीमाभागात लपल्याचा संशय

close