मुंडेंना शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची ऑफर ?

June 17, 2011 9:54 AM0 commentsViews: 3

17 जून

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि गोपीनात मुंडे यांच्यातल्या चर्चेत नेमकं काय झालं असावं याचं सगळ्यांनाच कुतुहल होतं. या चर्चेत शिवसेनेनं मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असं आता सूत्रांकडून समजतं आहे. 2014 साली सत्तेवर आल्यास मुंडेचं मुख्यमंत्री असतील अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंना दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

2014 ला युतीचं नेतृत्व कोण करणार हाच मुंडेंच्या नाराजीमागचा मुख्य मुद्दा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गोपीनाथ मुंडेंनी युती सोडून जाऊ नये यासाठी शिवसेनेनंच मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती अशी माहितीही सूत्रांकडून समजते. मुंडे यांना उद्धव ठाकरे यांनी ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये बैठक झाली होती. मात्र या घडामोडींमुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध ताणले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

close