कोल्हापुरात ‘आयआरबी’च्या गलथान कारभारमुळे एकाचा मृत्यू

June 17, 2011 1:57 PM0 commentsViews: 2

17 जून

कोल्हापुरातल्या आयआरबी कंपनीचा भोंगळ कारभार आज पुन्हा उघड झाला. पुलाचं काम करत असताना कोणताही सुचना फलक न लावल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडी रेल्वे फाटकाच्या इथे ब्रीज बांधण्याचे काम सुरु आहे.

पण या ब्रीजचं काम सुरु असताना कोणताही सुचना फलक लावला नव्हता. त्यामुळे आज पहाटे पन्हाळा तालुक्यातील दिलीप आभरे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रेल्वे ट्रॅकवरचे बांधकाम अपूर्ण असल्याने तो ब्रीजवरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे आणि पदाधिकार्‍यांनी भेट दिली. पण आयआरबी कंपनीला कोणत्याही सुचना न देता किंवा कोण याला जबाबदार याचा आढावा न घेता त्या तशाच निघून गेल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

close