भोसला स्कूलच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

November 12, 2008 3:18 PM0 commentsViews: 5

12 नोव्हेंबर,नाशिक निरंजन टकलेमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी नाशिकच्या भोसला मिल्ट्री स्कूलचा संबंध जोडल्याचा निषेध म्हणून या स्कूलच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. स्कूलचे सुप्रिटेंड राजेंद्र गायधनी, कमांडंट शैलेश रायकर यांनी आपले राजीनामे स्कूल प्रशासनाकडे सादर केले आहेत. गुरुवारी होणार्‍या मॅनेजमेंटच्या बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय होणार आहे. मालेगाव स्फोटाप्रकरणी गायधनी आणि रायकर यांची एटीएसनं सलग पाच दिवस चौकशी केली होती. त्यामुळे मॅनेजमेंटनं राजीनामे देण्यास भाग पाडलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close