शर्यतीत बैलांना दारु, गांजा देण्याची अघोरी प्रथा

June 17, 2011 2:40 PM0 commentsViews: 14

17 जून

अनेकदा खेळाडू स्पर्धेत जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेतात. पण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावात कारहुनवी सणाच्या निमित्ताने बैलाना दारु पाजून आणि गांजा खायला देऊन शर्यती लावण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कारहुनवी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने बैलांच्या झुंजी, शंकरपाट आणि बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. पण सलगर मध्ये स्पर्धेत बैलाला भान राहू नये आणि त्याने जिंकावे याकरता त्याला गांजा आणि दारु देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

close