वादग्रस्त अंपायर पध्दतीला सचिनचा पाठिंबा

June 17, 2011 2:58 PM0 commentsViews:

17 जून

युडीआरसी म्हणजेच अंपायर डिसीजन रिव्हीव सिस्टिमला बीसीसीआयने जरी विरोध केला असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या प्रणालीला पाठिंबा दर्शवला आहे. खेळात तंत्रज्ञानाचा उपयोग फायदेशीर असल्याचे सचिनने एका दैनिकाला दिलेल्या इंटरव्ह्यूवमध्ये सांगितलं आहे.

अंपायरने दिलेले चुकीचे निर्णय कमी करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग केला जाऊ शकतो असं तो म्हणाला. या तंत्रज्ञानाला बीसीसीआयचा सतत विरोध राहिला आहे. आणि सचिनसह इतर ज्येष्ठ खेळाडूंनी या प्रणालीला विरोध केल्यामुळेच बीसीसीआयने हे तंत्रज्ञान फेटाळले असं बोललं जात होतं.

इंग्लंडविरूद्धच्या सिरीजसाठी या प्रणालीचा उपयोग करू नये असं बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे इंग्लिश खेळाडू आणि मीडियाने बीसीसीआयवर टीका केली. पण आता सचिनने युडीआरसीला पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

close