माऊलींची पालखी ओढायचा मान भोसले कुटुंबीयांच्या बैलजोडीला

June 17, 2011 9:13 AM0 commentsViews: 36

17 जून

माऊलींच्या पालखीला दरवर्षी नवीन बैलजोडी जोडली जाते. हीच बैलजोडी संपूर्ण पालखीच्या सोहळ्यात महिनाभर माऊलींचा रथ ओढत असते. यावर्षी हा मान आळंदीच्या भोसले कुंटुंबाला मिळाला आहे. आज या बैलजोडीची आळंदीमधून मिरवणूक काढून पुजा केली जाणार आहे.

तर तुकाराम महाराजांच्या पालखीसाठीही बैलजोड्या निवडण्यात आल्यात. देहुमधील टाळगाव चिखलीचे कोडिंबा मळेकर आणि देहू गावातले अभिमन्यू काळोखे यांच्या बैलजोडींना यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढायचा मान मिळाला आहे.

हा मान मिळवण्यासाठी आसपासच्या गावातल्या 10 शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. मळेकर यांच्याकडे वारीची परंपरा आहे. या बैलजोडीच्या निमित्ताने आपल्याला वारीमध्ये सेवा करायची संधी मिळाली आहे अशी भावना मळेकरांनी व्यक्त केली आहे. येत्या 22 तारखेला तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर महिनाभर या बैलजोड्या तुकारामांची पालखी ओढतील.

close