सत्य साईंच्या खोलीत कोट्यावधींची ‘माल’मत्ता

June 17, 2011 5:51 PM0 commentsViews: 1

17 जून

सत्य साई बाबांच्या खासगी खोलीतली संपत्ती आज केंद्रीय एक्साईज विभागाने ताब्यात घेतली. बाबांच्या या खोलीला यजूर मंदिर म्हणतात. हे यजूर मंदिर आज उघडण्यात आलं. त्यात एक्साईज विभागाला तब्बल 12 कोटी रुपये रोख, 100 किलो सोनं आणि 307 किलो चांदी इतका खजिना मिळाला. यातील रोख 12 कोटी रुपये साई ट्रस्टच्या नावाने एसबीआय बँकेत असलेल्या खात्यात जमा केले जातील. तर 100 किलो सोनं आणि 307 किलो चांदी केंद्रीय एक्साईज विभागाच्या ताब्यात जाईल. बाबांची या सर्व संपत्तीचे मोजमाप करण्यासाठी 20 लोकांना 36 तास लागले.

close