नाराज गोपीनाथ मुंडे दिल्लीत दाखल

June 18, 2011 11:49 AM0 commentsViews: 23

18 जून, दिल्ली

गोपीनाथ मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. गोपिनाथ मुंडे हे आपल्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झालेत. आपली वेदना ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहेत. या बैठकीनंतरच आपण पुढची वाटचाल निश्चित करू असं मुंडेंनी स्पष्ट केल्यामुळं या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. दरम्यान गोपिनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांची भेट घेत आहेत. भाजपाध्यक्ष नितिन गडकरी हे सध्या डेहेराडूनमध्ये आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्लीत पोहोचले नाहीत तर बैठक रविवारी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत आपल्याला न्याय मिळेल अशी भावना मुंडे यांनी दिल्लीत आल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीनाथ मुंडेंना कुठलीही ऑफर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंडेंना देण्यासाठी राष्ट्रवादीकडे काहीही नसल्याचं पवार म्हणाले.

close