जे.डे हत्याप्रकरणी चौकशी सत्र सुरूच

June 17, 2011 4:03 PM0 commentsViews: 1

17 जून

जे.डे.हत्याप्रकरणी गेल्या दोन दिवसात पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. यात खबरी, जे. डेंच्या ओळखीची काही लोक आणि काही पत्रकारांचा समावेश होता. जे. डेंची हत्या ही वैयक्तिक वादातून झाली की बातमीमुळे दुखावलेल्यांकडून झाली या दोन्ही मुद्यांवर पोलिसांचा तपास सुरु आहे. शिवाय अन्वर आणि मतिन या दोघांचीही चौकशी सुरु आहे.

पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या दोघांनीही आपणच जे.डेंची हत्या केल्याची खोटी कबुली दिली होती. राजा डी साळवी याचा देखील या प्रकरणात सहभाग असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती क्राईम ब्रांचचे ऍडिशनल कमिश्नर देवेन भारती यांनी दिली.

close