मुंडेंचा आज होणार फैसला ?

June 19, 2011 9:57 AM0 commentsViews:

19 जून

नाराज गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यासाठी काल दिल्लीत व्यंकय्या नायडू यांच्या घरी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. या बैठकीत मुंडेंचं गार्‍हाणं ऐकून घेतलं गेलं आणि बैठक सकारात्मक झाल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. अध्यक्ष नितीन गडकरी डेहेराडून येथे अडकल्याने ते दिल्लीला काल येऊ शकले नव्हते. पण आजची अंतिम बैठक पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नायडू यांनी सांगितलं.

close