जालंधरमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांकडून चोप

November 12, 2008 1:17 PM0 commentsViews: 4

12 नोव्हेंबर जालंदरपंजाबमधल्या जालंधरमध्ये कॉलेज बंद करण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कॉलेज बंद करण्यासाठी आलेल्या परिषदेच्या कार्यकर्त्यांना थेट विद्यार्थ्यांनीच मारहाण केली. त्याच्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. बांग्लादेशी घुसघोरांना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं म्हणून, विद्यार्थी परिषदेनं कॉलेज बंदचं आवाहन केलं होतं. परंतु जबरदस्तीनं कॉलेज बंद करायला आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना, कॉलेजातल्या विद्यार्थ्यांच्याच चांगलाच चोप दिला.

close