कोकण रेल्वे मार्ग सुरळीत

June 19, 2011 10:24 AM0 commentsViews: 105

19 जूनकोकणात झालेल्या जोरदार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे सेवा ठप्प झाली होती. मात्र आज अखेर कोकण रेल्वेचा मार्ग सुरळीत झाला आहे. कोकण कन्या एक्सप्रेस गोव्याकडे आता रवाना झाली. पोमेंडीजवळ रेल्वे मार्गावर संरक्षक भिंत कोसळली होती. त्यानंतर कोकणची रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पण गेल्या दोन दिवसात पाऊस थांबल्याने भिंत हटवण्याच्या कामाला वेग आला. आणि आज हा मार्ग मोकळा करण्यात आला.

close